पुणे शहरात मुंबईहुन अधिक कोरोना रुग्ण, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले 'हे' कारण

पुण्याने (Coronavirus In Pune) मुंंबईलाही (Coronavirus In Mumbai) मागे टाकत कोरोना रुग्णांच्या संख्येत आघाडी घेतली आहे.पुण्यात वाढत असणार्‍या कोरोना रुग्णांंच्या संख्येवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohal) यांंनी कारण सांगत प्रतिक्रिया दिली आहे.

Murlidhar Mohol, Mayor of Pune (PC - ANI)

Coronavirus Maharashtra Update: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे पहिले रुग्ण हे पुण्यात आढळुन आले होते तेव्हापासुन सुरु झालेला कोरोनाचा हाहाकार आज चार महिने उलटल्यावरही कायम आहे. सुरुवाती पासुनच मुंंबई आणि पुणे हे कोरोनचे मुख्य हॉटस्पॉट होते. आता तर पुण्याने (Coronavirus In Pune)  मुंंबईलाही (Coronavirus In Mumbai)  मागे टाकत कोरोना रुग्णांच्या संख्येत आघाडी घेतली आहे. पुण्यात सद्य घडीला कोरोनाचे 1,34,913 रुग्ण आहेत यापैकी 39971 रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत 3336 जणांंचा आजवर मृत्यु झाला आहे तर 91606 जणांंनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे मुंंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,30,410 इतकी असुन यातील 1,05,193 रुग्ण बरे झाले आहेत 17,697 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 7,219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंंबईला मागे टाकत पुण्यात वाढत असणार्‍या कोरोना रुग्णांंच्या संख्येवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohal)  यांंनी कारण सांगत प्रतिक्रिया दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे कारण कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर पार पडत आहेत, परिणामी पहिल्या किंंवा दुसर्‍याच टप्प्यात कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत, आपण आकडेवारी पाहिल्यास कोरोना अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंपेक्षा बरे झालेल्यांची संख्या फार आहे त्यामूळे मुंबईहुन अधिक कोरोना रुग्ण पुण्यात आढळले असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणुन घ्या

ANI ट्विट

दरम्यान महाराष्ट्रात सद्य घडीला 6 लाख 15 हजार 477 कोरोना रुग्ण असुन आजवर 20 हजार 687 जणांचा मृत्यु झाला आहे. राज्यात एकुण 4,37,870 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे 1,56,608 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (COVID 19 Active Cases) आहेत.