Prostitution Racket At Spa in Vashi Mall: नवी मुंबई मध्ये स्पा सेंटर खाली वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणार्या महिलेला अटक
जी महिला वेश्या व्यवसायामध्ये मुलींना ढकलत आहे तिला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दोन पीडीतांना देखील रेस्क्यू हो मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये 40 वर्षीय महिलेला Prostitution Racket चालवत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हे रॅकेट स्पा मधून चालवले जात होते. वाशी मधील एका प्रसिद्ध मॉलमधील ही घटना असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी एका टीप वर ही कारवाई केली. बनावट ग्राहकाला पाठवले. तेव्हा स्पा मध्ये गेल्यावर साधारण विशी मध्ये असलेल्या दोन मुली flesh trade चं काम करत असल्याचं समोर आलं. त्यांना जबरदस्तीने या कामामध्ये आणण्यात आलं आहे. दरम्यान ही माहिती मीडीयाला Anti-Human Trafficking Cell चे सिनियर इन्सपेक्टर Prithviraj Ghorpade यांनी दिली आहे.
दरम्यान जी महिला वेश्या व्यवसायामध्ये मुलींना ढकलत आहे तिला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच दोन पीडीतांना देखील रेस्क्यू हो मध्ये पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आयपीसी 370, 506 अंतर्गत गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे. तसेच Immoral Traffic (Prevention) Act,देखील दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नवी मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी आणखी एका घटनेत, दोन जणांना अटक करण्यात आली आणि बांगलादेशातील एका 14 वर्षीय मुलीची नवी मुंबईत वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमधून गेल्या आठवड्यात सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी शहरातील तळोजा परिसरातील रहिवासी सोसायटीवर छापा टाकून एका चोरट्याला गुप्त माहिती मिळाल्यानंतर तरुणीची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. Samon Shaikh आणि Mohinoor Mandal आरोपींची नावं आहेत. तर 14 वर्सीय मुलगी बांग्लादेशी आहे. या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)