Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या

शूटिंगच्या वेळेस जर कोणी न्यूड शूट करण्यासाठी नकार देत असल्यास त्याच्यावर करार तोडल्याचा ठपका ठेवत दंडाची फी भरण्याची धमकी देत बळजबरीने त्यांच्याकडून काम करवून घेतले जात असे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने वेबसीरीजच्या नावाखाली शहरात पॉर्न फिल्म बनवणार्‍या एका प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रान्चने गुजरातच्या सूरत मधून एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ही या प्रकरणामधील नववी अटक आहे. यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth), फोटोग्राफर यास्मीन खान, ग्राफिक डिझायनर प्रतिभा नलावडे, मोनू जोशी कॅमेरामॅन, भानु ठाकुर आणि मोहम्मद नासिर यांना अटक झाली आहे.सोबतच उमेश कामत (Umesh Kamat) नावाच्या एका हायप्रोईल व्यक्तीला अटक झाली आहे. यामध्ये एका बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा नवरा आर्थिक रसद पुरवत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच पोलिस तपासामध्ये मुंबई बाहेर देशा-परदेशातही याचं जाळं पसरल्याची माहिती आहे.

दरम्यान सिनेसृष्टीमध्ये काम करणार्‍या होतकरू कलाकारांना कामाचं आमिष दाखवून शॉर्ट फिल्मच्या नावाने अ‍ॅग्रिमेंट बनवलं जात असे. शूटिंगच्या वेळेस जर कोणी न्यूड शूट करण्यासाठी नकार देत असल्यास त्याच्यावर करार तोडल्याचा ठपका ठेवत दंडाची फी भरण्याची धमकी देत बळजबरीने त्यांच्याकडून काम करवून घेतले जात असे. मढ परिसरात सुरू असलेल्या याअ प्रकरणी दोन महिला कलाकारांनी तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी काल (9 फेब्रुवारी) पर्यंत 2 FIR नोंदवले आहेत.

ANI Tweet

प्रॉपर्टी सेलच्या प्रेस नोटनुसार, फिल्म प्रोडक्शन कंपनीने Hothit Movies नावाने एक अ‍ॅप काढलं होतं. त्यामध्ये पॉर्न फिल्म अपलोड केली जात होती. त्या अ‍ॅप्लिकेशन द्वारा बेकायदेशीरपणे सब्सक्रिपशन फी देखील घेतली जात असे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 5 लाख 68 हजार रूपयांचे सामान आणि पॉर्न फिल्मच्या काळ्या धंद्यातून कमावलेले 36 लाख 60 हजार रूपये देखील जप्त केले आहेत. Sex Education साठी Porn सर्वात जास्त मदतीचं ठरत असल्याचं तरूणाईच मत: रिपोर्ट्स.

अभिनेत्री गहना वशिष्ट च्या टीम कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये तिचा समावेश नाही. तिची प्रकृती नाजूक आहे. मागील वर्षभरात 4 वेळा हृद्यविकाराचा सौम्य झटका येऊन गेला आहे. तिला अस्थमाचा त्रास आहे. पोलिसांनी तिचा माणूसकीच्या दृष्टीने विचार करावा असं म्हटलं आहे.