Anil Deshmukh Case: अनिल देशमुखांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर, पीएमएलए न्यायालयाचा निर्णय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हा दाखल केलेल्या पाच जणांना बुधवारी विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुन्हा दाखल केलेल्या पाच जणांना बुधवारी विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. विशेष पीएमएलए न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी दिल्लीस्थित कथित हवाला ऑपरेटर सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र कुमार जैन, व्यापारी किशोर दिवानी आणि देशमुख यांचे चार्टर्ड अकाउंटंट विनोद हसनी आणि विशाल खटवानी यांना प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केलान्यायालयाने त्यांच्या नियमित जामीन याचिकांवर 1 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

ईडीने दावा केला आहे की त्यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे की देशमुख यांच्या सूचनेनुसार, वाझे यांनी मुंबईतील काही बार मालकांची बैठक बोलावली. तसेच त्यांच्या आस्थापना सुरळीत चालण्यासाठी ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून 4.7 कोटी रुपये वसूल केले. त्यानंतर, ईडीने दावा केला की, देशमुख यांचा मुलगा हृषिकेश याला 4.18 कोटींची रक्कम दिल्लीस्थित शेल संस्थांद्वारे, जैन बंधूंद्वारे संचालित केली.

देशमुख यांच्या नेतृत्वाखालील चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई शिक्षण संस्था, नागपूरला देणगी म्हणून मिळाली. हसनी आणि खटवानी यांनी जैन बांधवांची हृषिकेशशी ओळख करून दिली होती. कथितपणे, कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या श्री साई शिक्षण संस्था, नागपूरला देणगीमध्ये रूपांतरित करण्यासाठी ही ओळख करुन देण्यात आले असल्याचे समोर आले.