PFI कडून शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिल्याचा खुलासा, एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
औरंगाबादमधून अटक केलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांकडून अजब खुलासा करण्यात आला आहे. मराठवाड्यात शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.
राज्यात दोन आठवड्यापासून राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने PFI शी जोडलेल्या परिसरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी धडक कारवाई केली असुन यांत अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बीड (Beed), मुंबई (Mumbai), नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), जळगाव (Jalgaon) आणि कोल्हापूरसह (Kolhapur) अशा विविध ठिकाणी कारवाई करत अनेकांना कडक कारवाई करण्यात आली असुन या तपासातून काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
औरंगाबादमधून (Aurangabad) अटक केलेल्या पीएफआय (PFI) कार्यकर्त्यांकडून अजब खुलासा करण्यात आला आहे. मराठवाड्यात (Marathwada) शारिरीक प्रशिक्षणाच्या (Physical Training) नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या तपासात (ATS Investigation) समोर आले आहे. हे प्रशिक्षण एका बंद शेडमध्ये देण्यात येत होते. त्याशिवाय, अटकेत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून (Bank Account) अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसने (ATS) न्यायालयात केला आहे. (हे ही वाचा:- सर्वसामान्यांचे गृहस्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता; CM Eknath Shinde यांचे बांधकाम व्यावसायिकांना 'हे' आवाहन)
तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आरोपींचे मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop), हार्ड डिस्क (Hard Disk) जप्त करण्यात आले होते. त्यातून एटीएसला महत्त्वाच्या बाबी समजल्या आहेत. आरोपी परवेझ खान (Parvez Khan) याने औरंगाबादेतील (Aurangabad) जटवाडा रोड, पडेगाव आणि नारेगाव येथे निर्जनस्थळी बंद शेडमध्ये दहशतवादी प्रशिक्षण दिल्याचा दावा एटीएसने न्यायलयात केला आहे. तरी केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)