Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे सोमवारी कार्यकर्त्यांना करणार संबोधित

राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, उद्धव ठाकरे सोमवारी 'गेटवे ऑफ इंडिया'जवळील पक्षाच्या संस्थापकाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि नंतर संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करतील.‌

Uddhav Thackeray (PC - ANI)

शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी सांगितले की, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे सोमवारी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, उद्धव ठाकरे सोमवारी 'गेटवे ऑफ इंडिया'जवळील पक्षाच्या संस्थापकाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि नंतर संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करतील.‌ शिवसेना नेते म्हणाले, हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे.पक्षाच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावरून शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वादावर भारतीय निवडणूक आयोग (ECI) सध्या सुनावणी करत आहे.

पक्षाच्या निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण'वर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे आपली बाजू मांडली आहे आणि स्वतंत्र संस्थेवर दबावाच्या राजकारणाचा कोणताही परिणाम होत नाही, असा विश्वास राऊत यांनी शनिवारी व्यक्त केला. काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी होण्यासाठी जम्मूला जाताना राज्यसभा सदस्य राऊत म्हणाले की, ही एक बिगर राजकीय चळवळ आहे, ज्याला पाठिंबा मिळत आहे. हेही वाचा Amol Mitkari Tweet: एकनाथ शिंदे यांचे सरकार कोसळणार, अमोल मिटकरींचा दावा

भारतीय जनता पक्ष (BJP) या यात्रेला घाबरत असल्याने त्यावर टीका करत असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, लोकशाहीत जनतेची इच्छा सर्वोच्च असते. ज्याला जनतेचा पाठिंबा असेल तोच पंतप्रधान होऊ शकतो, असे ते म्हणाले.