Panvel Accident: मानखुर्द येथे डंपरची भरधाव ऑटोरिक्षाला धडक, तिघांसह 9 महिन्याचं बाळ गंभीर
सायन- पनवेल महामार्गाजवळ मानखुर्द टी- जंक्शन येथे गुरुवारी रात्री डंपर ट्रक, १८ चाकी ट्रेलर डंपर आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात झाला.
Panvel Accident: सायन- पनवेल महामार्गाजवळ मानखुर्द टी- जंक्शन येथे गुरुवारी रात्री डंपर ट्रक, १८ चाकी ट्रेलर डंपर आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात(Accident) झाला. या अपघाता ३ जणांसह ९ महिन्यांचे बाळ देखील गंभीर जखमी झाले आहे. मोहम्मद अन्सारी असं रिक्षा चालकाचे नाव आहे. कुर्ल्याहून जोपडं रिक्षात बसलं आणि त्यांना नवी मुंबईतील सीवुड्सकडे जायचं होते. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (हेही वाचा- नागपाडा सिग्नलवर जेजे हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला आग; पहा व्हिडिओ)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या ११ ४५च्या सुमारास हा अपघात घडून आला. ऑटो रिक्षा वाशीच्या दिशने जात होती. रस्त्याच्या मधोमध पार्किंग लाईट न लावता एक डंपर ट्रक होता. डंपर पुढे जात असताना त्याच्या विरुध्द दिशेने येणारा दुकारा १८ चाकी ट्रेलर डंपरला जोरात धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, डंपर डाव्या बाजूला असलेल्या ऑटोवर आदळला. या अपघातात अब्दुल डबीर आणि त्याची पत्नी तस्मिया आणि त्यांची चिमुकली जखमी झाले. त्याच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली. रिक्षा चालक अन्सारी हा देखील जखमी झाला.
ट्रेलर चालक हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अब्दुल डबीर, ज्यांना सर्वात गंभीर दुखापत झाली, त्यांच्या दोन्ही हातांमध्ये फ्रॅक्चर झाले आणि त्यांना त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.