Pandharpur Wari 2020: आज संत तुकोबा, ज्ञानोबा महाराजांच्या पालख्या ST बसने पंढरीकडे प्रस्थान ठेवणार
आज एसटी महामंडळाच्या 'विठाई' या वारकर्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष बसच्या माध्यमातून संताच्या पादूका पंढरपूरला रवाना होणार आहेत.
Ashadhi Ekadashi 2020: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी वारकरी पायी वारी करत पोहचतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीचं स्वरूप बदललं आहे. आज आषाढी दशमी दिवशी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानोबा आणि संत तुकोबारायांच्या पादुका एस टी बसने रवाना केल्या जाणार आहेत. आज एसटी महामंडळाच्या 'विठाई' या वारकर्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष बसच्या माध्यमातून संताच्या पादूका पंढरपूरला रवाना होणार आहेत. Ashadhi Ekadashi 2020: पंढरपुरामध्ये तयारी अंतिम टप्प्यात; विठ्ठल रूक्मिणी मंदिर सजावट ते संचारबंदी नियम कोरोना संकटात असा असेल आषाढीचा सोहळा.
यंदाच्या आषाढी वारीमध्ये वैष्णवांचा मेळा नसल्याने अनेकांनी घरीच राहून विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. दरम्यान आज आज दुपारी 1 वाजता एसटी बस पंढरीसाठी रवाना होतील. यामध्ये आळंदी मधून संत ज्ञानेश्वर, देहू मधून संत तुकाराम आणि नाशिक मधून संत निवृत्ती महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे जाण्यासाठी रवाना होणार आहेत. पादुकांसोबत सोशल डिस्टन्सिंग राखत सुमारे 20 वारकरी देखील रवाना होती.
आळंदी, देहू मध्ये विठाई एसटी बस दाखल झाल्या असून त्यांचं सॅनिटाईयझेशन करून त्यामधून पुढील काही तासांतच पालख्या प्रस्थान ठेवतील. यंदा या एसटी बस सजवण्यात आल्या आहेत. बससभोवती पोलिसांचा फौजफाटा असून नागरिकांनी, भाविकांनी विनाकारण गर्दी करू नये असे आवाहन देखील करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रामध्ये उद्या 1 जुलै दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात काल पासूनच 2 जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपुरासह राज्यातील सारी मंदिरं बंद असल्याने नागरिकांना घरीच आषाढीचा सोहळा साजरा करावा लागणार आहे.