Palghar Mob Lynching Case Update: पालघर मधील साधू हत्याकांड प्रकरणी 2 पोलिस कर्मचार्‍यांना सक्तीची निवृत्ती तर एक जण बडतर्फ

एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रासह देशाला हादरवणारी साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्याप्रकरणी काल (30 ऑगस्ट) दिवशी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिसांकडून 3 पोलिसांना बडतर्फ करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Maharashtra Police | (PTI photo)

एप्रिल 2020 मध्ये महाराष्ट्रासह देशाला हादरवणारी साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्याप्रकरणी काल (30 ऑगस्ट) दिवशी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिसांकडून पालघर  मधील कासा पोलिस स्टेशन मधील 2 पोलिसांना सक्तीची निवृत्ती तर एकाला बडतर्फ करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार हे पोलिस कर्मचारीअसिस्टंट पोलिस इन्सपेक्टर(Assistant Police Inspector) अनंत राव काळे (Anandrao Kale), असिस्टंट सबइन्सपेक्टर (Assistant Sub Inspector) रवी साळूंखे ( Ravi Salunke) आणि हेड कॉन्स्टेबल ( Head Constable) नरेश धोंड (Naresh Dhod) आहेत.

दरम्यान 16 एप्रिल दिवशी पालघर मध्ये गडचिंचले गावात झालेल्या 2 साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्या झाली होती. या घटनेच्या वेळे काळे हे कासा पोलिस स्टेशनचे इन चार्ज होते. या तिघांसोबतच हत्याकांडानंतर 5 अन्य पोलिसांनादेखील नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

पालघर साधू हत्याकांडाची सध्या सीआयडी कडून चौकशी आणि तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये 150 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांना या प्रकरणात जबाबदार ठरवत सीआयडीने 2 चार्जशीट्स दाखल केल्या आहेत.

ANI Tweet

11 ऑगस्ट दिवशी स्थानिक कोर्टाने 28 आरोपींना जामीन मंजुर केला आहे. यांची नावं पहिल्या 90 दिवसांच्या चार्जशीटमध्ये नाहीत. दरम्यान पहिल्या 2 FIR मध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांखाली 28जणांना अटक झाली होती. यामध्ये 10 जणांना जामीन देण्यात आला आहे. तर उर्वरित 18 जण हे पुन्हा कस्टडीमध्ये गेले आहेत. त्यांची नावं 3 ऑगस्ट दिवशीच्या तिसर्‍या चार्जशीटमध्ये आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now