Palghar Crime: दारूच्या नशेत पत्नीचा चाकूने वार खून केल्याप्रकरणी नराधम पतीला अटक; पालघरमधील घटना
तो दारू पिऊन घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना त्रास देत असे. शुक्रवारी पहाटे त्याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केला.
Palghar Crime: पालघरमधून हत्येची घटना समोर आली आहे. विरार मध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालून तिची हत्या (Man Stabs Wife To Death)केल्याचे समोर आले आहे.विरारमध्ये शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. आरोपी पती दारू पिऊन पहाटे साडेचारच्या सुमारास घरी आला. दररोज प्रमाणे त्याने पत्नीशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी राग अनावर झाल्याने पतीने पत्नीचा खून केला. गोपाल राठोड असे आरोपी पतीचे नाव आहे.(हेही वाचा:Pune Crime: सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून जावयाने आयुष्य संपवलं )
पत्नीशी झालेल्या वादानंतर पतने तिचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपाखाली आरोपी पतीला अटक केली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी गोपाल राठोड याला दारू पिण्याची सवय होती आणि तो दारू पिऊन घरी परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना त्रास देत असे. शुक्रवारी पहाटे 4.30 च्या सुमारास, त्याचा आणि त्याची 32 वर्षीय पत्नी भारती यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात त्याने चाकू काढला आणि तिची हत्या केली.
दरम्यान, राठोड दाम्पत्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर, एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आला, ते पोलिसांनी सांगितले. आरोपीला सध्या अटक करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103 (1) (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.