Sale Of Jewellery: मुंबईत गुडीपाडव्याला दागिन्यांचा तब्बल 500 कोटींचा व्यापार बुडण्याची शक्यता

त्यामुळे या दिवशी सोने (Sale Of Jewellery) किंवा महत्त्वाची खरेदी करायला प्राधान्य दिले जाते. म्हणूनच सोनेनाणे, घरखरेदीच्या बाजारपेठेला या दिवशी विशेष उठाव असतो.

Kumar Jain, President, India Bullion and Jewellers Association (Photo Credit: ANI)

गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2021) मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहुर्तापैकी एक आहे. त्यामुळे या दिवशी सोने (Sale Of Jewellery) किंवा महत्त्वाची खरेदी करायला प्राधान्य दिले जाते. म्हणूनच सोनेनाणे, घरखरेदीच्या बाजारपेठेला या दिवशी विशेष उठाव असतो. परंतु, देशात कोरोनाचे संकट असल्यामुळे गेल्यावर्षी गुडीपाढवा अत्यंत साध्या पद्धतीने आणि घरात बसून साजरा करावा लागला होता. मात्र, यावर्षीही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, गुडीपाडव्याचा सण केवळ 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. यातच दागिने व्यापाऱ्यांचा गेल्या वर्षीप्रमाणे आताही व्यापार बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुडीपाडव्याच्या दिवशी केवळ मुंबई दागिना बाजारात 500 कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री होते. परंतु, लॉकडाऊनमध्ये येणारा हा दुसरा गुढीपाडवा आहे. मुंबईत या दिवशी दागिन्यांचा 500 कोटींचा व्यापार बुडण्याची शक्यता आहे, असे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अध्यक्ष कुमार जैन यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Mumbai: कोरोनाची लस घेतल्यानंतर नागरिकांना सर्टिफिकेट मिळणे मुश्किल, Co-Win अॅपमध्ये तांत्रिक समस्या येत असल्याने केंद्रावर गोंधळ

एएनआयचे ट्वीट-

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. सोन्याचे दर अस्थिर असले तरी सोने या धातूची मागणी दिवसागणिक वाढत आहे. कारण, देशात गेल्या वर्षी लॉकडाऊन लागला होता. त्यानंतर सोन्याच्या किंमती गगणाला भिडल्या होत्या. पण आता गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.