Gas Leakage in Mumbai Update: मुंबईतील घाटकोपर, चेंबूर, कांजूरमार्ग, पवई येथे कुठेही गॅस गळती झाली नसल्याचे अग्निशमन दलाची माहिती
मुंबईतील कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, पवई या परिसरातून गॅस गॅस गळती सदृश्य वास येत असल्याच्या काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.
मुंबईत शनिवारी (6 जून) रात्री 10 च्या आसपास चेंबूर (Chembur), घाटकोपर (Ghatkopar), कांजूरमार्ग (Kanjurmarg), विक्रोळी (Vikroli) आणि पवई (Powai) येथील रहिवाशांकडून संशयित गॅस गळती (Gas Leakage) होण्याच्या काही तक्रारी मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) आल्या होत्या. या परिसरात गॅसचा वास येत असल्याचे तक्रारीत म्हणण्यात आले होते. त्यानुसार मुंबई मनपाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र रात्रभराच्या तपासानंतर मुंबईत कुठेही गॅस गळती झाली नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मुंबईतील कांजूरमार्ग, घाटकोपर, विक्रोळी, पवई या परिसरातून गॅस गॅस गळती सदृश्य वास येत असल्याच्या काही तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ज्या भागातून या तक्रारी आल्या तेथे अग्निशमन दलाच्या 17 यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार या परिसरांत तपास सुरु होता. मात्र येथे कुठेही वायुगळती न झाल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये असेही अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास आमची हजमत वाहने सज्ज आहेत असेही या विभागाकडून सांगण्यात येत आहे. तरीही कोणाला गॅस गळतीच्या वासनामुळे त्रास होत असेल, तर त्यांनी आपल्या तोंडावर ओला टॉवेल किंवा कपडा बांधावा आणि नाक झाकून घ्यावे, अशा सुचनाही बीएमसीकडून देण्यात आल्या आहेत.