Nia Seizes Building In Pune: दहशतवादी कारवायांसाठी वापर झालेली पुणे येथील इमारत एनआयएकडून जप्त

त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता.

NIA | (Photo Credits: Twitte/ANI)

आयसिसच्या (ISIS) दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत जप्त केली. मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत हे दहशतवादी असेल्याचे समोर आले आहे.  (हेही वाचा - Pune Serial Bomb Blasts Plot: पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इसिस दहशतवाद्यांचा कट, सिरीयामधून मिळाल्या होत्या सूचना)

एनआयएने या प्रकरणात आता पर्यंत एनआयएने मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली.

मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. 2 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तपासासाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. कोंढव्यात त्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँम्बस्फोट केले होते.