बीड: संसार फुलण्याआधीच काळाचा घाला, लग्नाच्या बाराव्या दिवशीच नवविवाहीतेचा मृत्यू
तिला वाचविण्याचे प्रयत्न केले. पण, कोमलचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले नाही. गेवराई पोलीसांनी घटनेची नोंद घेऊन पंचनामा केला. तसेच, शवविच्छेदनासाठी कोमल हिचा मृतदेह मादळमोही आरोग्य केंद्राकडे पाठवले.
बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेल्या मादळमोही गावची कोमल संजय शेलार (Komal Sanjay Shelar) या केवळ 19 वर्षे वयाच्या तरुणीने मोठी स्वप्न पाहात बोहल्यावर पाऊल ठेवले. इतरांप्रमाणे आपलाही संसार फुलणार असे स्वप्नं बाळगून ती सासरी आली. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कोमलच्या हातांवरची मेहेंदी आणि अंगावरची हाळदही पुरती उतरली नव्हती. तोपर्यंत काळाने घाला घातला. विवाहा नंतर अवघ्या 12 दिवसांनी कोमलचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. घराची साफसफाई करताना कुलर साफ करताना कोमल हिला विजेचा धक्का (Electric Shock) बसला. तिचा जागेवर मृत्यू झाला.
कोमलचे सासर आणि शेलार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. प्राप्त माहितीनुसार, माहितीनुसरा, जालना जिल्ह्यातील तिर्थपूरी गाव हे कोमल हिचे माहेर. मादळमोही गावातील संजय शेलार या तरुणासोबत कोमल हिचा 24 मे रोजी विवाह झाला. संजय आणि कोमल यांनी अत्यंत साधेपणाने विवाह केला होता. विवाह केल्यानंतर दोघेही आपल्या संसारात रममान झाले होते. घटना घडली त्या दिवशी कोमल नेहमीप्रमाणे सकाळी उठली. घराची साफसफाई करु लागली. दरम्यान, साफसफाई करताना तिचा हात कुलरला लागला. कुलरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का कोमला तीव्र स्वरुपात बसला. कोमलचा जागीच मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा कोमल ओल्या फडक्याने कुलर साफ करत होती अशीही माहिती आहे. (हेही वाचा, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जाड असल्या कारणाने सासरच्यांकडून होत होता छळ)
दरम्यान, घडला प्रकार ध्यानात येताच कोमलच्या सासरच्या मंडळींनी घरात धाव घेतली. तिला वाचविण्याचे प्रयत्न केले. पण, कोमलचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले नाही. गेवराई पोलीसांनी घटनेची नोंद घेऊन पंचनामा केला. तसेच, शवविच्छेदनासाठी कोमल हिचा मृतदेह मादळमोही आरोग्य केंद्राकडे पाठवले.