राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या 'सर्वोत्कृष्ट संसदपटू'; जाणून घ्या त्यांची कामगिरी

संसदेच्याही कामकाजात सुप्रिया सुळे यांची उपस्थिती लक्षणीय असते. या सर्वांचाच विचार करून सुप्रिया सुळे या यंदाही ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ (Best Performer In Lok Sabha) ठरल्या आहेत. मागच्यावर्षीही त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Supriya Sule (Photo Credits-Twitter)

राज्यातील राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणजे एक धडाडीचे नेतृत्व. आपले प्रत्येक विचार ठोसपणे, स्पष्टपणे मांडण्यापासून ते जवळजवळ प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होण्यापर्यंत सुप्रिया ताई स्वतःला जोकून देतात. संसदेच्याही कामकाजात सुप्रिया सुळे यांची उपस्थिती लक्षणीय असते. या सर्वांचाच विचार करून सुप्रिया सुळे या यंदाही ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ (Best Performer In Lok Sabha) ठरल्या आहेत. मागच्यावर्षीही त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उपस्थिती ही 100 टक्के राहिली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या संसदेमधील कामजाबद्दल बोलायचे झाले तर, संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुप्रिया सुळे यांनी 34 या दरम्यान त्यांनी चार खासगी विधेयके मंडळी आहेत. एकूण चर्चेमध्ये 147 प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा प्रकारे सर्वच बाबतील सुप्रिया सुळे अव्वल ठरल्याने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवडण्यात आले आहे. याधीही 2018 मध्ये त्यांना ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू’ म्हणून गौरविण्यात आले होते. लोकसत्ता वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा: खासदारांचे प्रगतीपुस्तक; शिवसेनेचे अरविंद सावंत ठरले अव्वल, तर उदयनराजे शेवटून पहिले)

लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात खासदारांनी केलेली कामे, अधिवेशन काळात उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रश्न मांडतानाचा प्रभावीपणा अशा विविध मुद्द्यांवर हे सर्वेक्षण पार पडते. दरम्यान संसदेची अनेक अधिवेशने आपण पाहत असतो. त्यामध्ये अनेक खासदार बरेचवेळा काहीच बोलत नाहीत आणि जे बोलत आहेत त्यांच्यामागे थट्टा मस्करी सुरु असते. मात्र याबाबत सुप्रिया सुळे अतिशय विरुद्ध आहेत. संसदेमध्ये बोलत असताना त्यांचा प्रभावीपणा आपण सर्वांनीच पहिला आहे, तसेच दुसरे कोणी बोलत असताना ज्या प्रकारे त्या प्रश्न उपस्थित करतात ते पाहून त्यांच्या योग्य उपस्थितीची जाणीवही होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif