मुंबईत एनसीबीकडून जप्त केलेले 52 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट

या समितीत एनसीबीसह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

NCB | File Image

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरातून जप्त केलेले 5,485 किलो अमली पदार्थ शुक्रवारी नष्ट केले. नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 52 कोटी रुपये आहे. या करण्यात आली होती. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. (हेही वाचा - Pune Drugs Case: पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक)

उच्च दर्जाचे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत एनसीबीसह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने प्रकरणांचा आढावा घेऊन तळोजा, महाराष्ट्र येथे अमली पदार्थांचा साठा नष्ट केला. जप्त करण्यात आलेल्या सुमारे 10 किलो कोकेनचा त्यात समावेश होता. दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत अनेक परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती.  हे अमली पदार्थ प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतून तस्करी करून भारतात आणले होते.

दरम्यान या कारवाईदरम्यान 52 हजार 130 खोकल्याची औषधे नष्ट करण्यात आली. या बाटल्या धारावी परिसरातून जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईत एकूण 5,479 किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.