Nashik Weather forecast For Tomorrow: नाशिकचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज

एकीकडे तापमानातून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पत्रे उडाले.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

नाशिक (Nashik)  शहरासह जिल्ह्याला रविवारी जोरदार पावसाने झोडपले. एकीकडे तापमानातून नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पत्रे उडाले. उमराणे, तिसगाव परिसरात जवळपास 25 कांदाशेड उद्ध्वस्त झाले. तसेच पावसामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. वादळी वाऱ्याने 25 कांदाशेड उद्ध्वस्त, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.पाऊस बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर मिळाला आहे.

पण दुसरीकडे खूप नुकसान देखील केल आहे.चांदवड शहरासह तालूक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. एकांतरीत तर काय गेल्या दोन दिवसात पावसाने नाशिक शहराला चांगलच झोडपलं आहे. आज नाशिक मध्य गडगडाट सोबत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन कारा.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने नाशिक शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे..हेही वाचा: Nagpur Weather Forecast For Tomorrow: नागपूरचे उद्याचे हवामान कसे असेल? पहा अंदाज

नाशिकत पावसाचा धुमाकूळ, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ट्रान्सफॉर्मर फुटले, 70 ते 80 गावांची बत्ती गुल. मध्यरात्री झालेल्या पावसात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहराच्या काही भागासह 70 ते 80 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. वीजनिर्मिती केंद्रातील 132 के व्ही सब स्टेशनमधील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने वीज पुरवठा खंडित झालेला. नाशिक मध्ये सध्या पावसाने चांगला धुमाकूळ घातलाय,त्यामुळे कृपया हवामान अंदाज पाहून घरच्या बाहेर जाण्याचे नियोजन कारा.