Nashik Fire: नाशिकमध्ये अग्नितांडव! घराला आणि गोदामाला भीषण आग; 50 दुचाकी जळून खाक

सकाळी सात ( Nashik Fire News) वाजेच्या सुमारास आगीची घटना घडली.

Fire (PC - File Image)

Nashik Fire : जुने नाशिक परिसरात घराला आणि गोदामाला भीषण आग लागली. आग इतकी भयानक होती की त्यात 50 पेक्षा जास्त दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी सात ( Nashik Fire News) वाजेच्या सुमारास आगीची घटना घडली. स्थानिकांना आगीची घटना समजताच त्यांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू (Nashik News) केले. मात्र, आग इतकी भीषण होती की त्यात तब्बल 50 दुचाकी जळून खाक झाल्या.  (हेही वाचा :Pune Fire Video: रविवार पेठ परिसरात पहाटे तीन मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात )

परिसरात धुराचे मोठमोठे लोट निघत होते. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण परिसरात धूर पसरला (Fire In Old Nashik Area) होता. आग विझविण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, तेथे उभ्या असलेल्या 50 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

पुण्यात रविवार पेठ परिसरातील तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील किराणा दुकानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि एक पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. पुणे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. आगीत दुकाने जळून खाक झाली आहेत.