Nashik Dengue: नाशिक शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या 900 पार, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

मनपाच्या मोहिमेत 3050 घरांमध्ये आढळली डास उत्पत्ती स्थाने आढळून आली.

Dengue | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

नाशिक शहरात (Nashik City) डेंग्यू (Dengue) रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, रुग्णसंख्या थेट 900 पार पोहचल्याचे विदारक चित्र आहे. दरम्यान, डेंग्यूपुढे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने (Health Department) गुडघे टेकले आहे. या महिन्यात 323 रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असून, ऑगस्ट अखेर या आकडेवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  (हेही वाचा - Reduce the Risk of Dengue During Monsoon: पावसाळ्यामध्ये वाढणाऱ्या डेंग्यू आजाराचा धोका कसा कमी करावा?)

शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या डेंग्यू रुग्णांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने सहाशे नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. मनपाच्या मोहिमेत 3050 घरांमध्ये आढळली डास उत्पत्ती स्थाने आढळून आली. डास प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी 175 विशेष गट स्थापन करून शहरभर संशयित डेंग्यू रुग्ण व डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांनी डास प्रतिबंधक कार्यवाहीच्या मोहिमेत सहकार्य करावे, आपापल्या घरात व परिसरात डास उत्पत्ती स्थाने तयार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

डास प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी 175 विशेष गट स्थापन करून शहरभर संशयित डेंग्यू रुग्ण व डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान विशेष पथकाव्दारे दोन लाखांहून अधिक घरांना भेटी देण्यात आल्या. महानगरपालिकेतर्फे नागरिकांना डेंग्यूबाबत माहिती दिली जात आहे. नाशिक महानगरपालिकेत गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, वैद्यकीय रजेवर आहे.