महाराष्ट्र: शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मासळी विक्रेते यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मासळी विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, मुंबईचे डबेवाले आणि इतर काही छोटे व्यावसायिकांनाही विशेष पॅकज जाहीर करावे" असे मागणीपर पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला नसला तरीही मिनी लॉकडाऊन प्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे समाजातील गोरगरीब जनतेचे, छोट्य घटकांचे नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी छोटे व्यावसायिक आणि गरीबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्याचप्रमाणे "शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, मासळी विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, मुंबईचे डबेवाले आणि इतर काही छोटे व्यावसायिकांनाही विशेष पॅकज जाहीर करावे" असे मागणीपर पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (Break the Chain) संचारबंदी घोषित केली आहे. त्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत आहे. लोकांचे जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सरकारबरोबर उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता पॅकेज जाहीर केले आहे, पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचं पटोले म्हणाले. त्यात शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा त्यांना आवर्जून उल्लेख केला आहे.हेदेखील वाचा- CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
संचारबंदीच्या काळात भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे सलून, फुलविक्रेत्यांवर, टॅक्सी चालकांवरही याचा परिणाम होणार आहे. धार्मिक स्थळांवर बंदी असल्यानं फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येईल. शिवाय मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक दि चेन' चे नवे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मात्र, या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 5 हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर जाहीर केले आहे. तसेच राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडक टाळेबंदी लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2021 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

