Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन 3 कामगारांचा मृत्यू, 7 जखमी
यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये हा स्फोट झाला.
Nagpur Explosives Factory Blast: नागपूरमध्ये स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरमधील चारमुंडी कंपनीमध्ये हा स्फोट झाला. स्फोट दुपारी दीडच्या सुमारास झाला. यात सात जण जखमी असून जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोट कसा झाला याबाबत माहिती उघड झाली नाही. पण, कंपनीमध्ये अनेक कामगार तेव्हा कंपनीत होते अशी माहिती आहे. नागपूरमध्ये याआधीही स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला होता. दरम्यान, काल बुधवारी डोंबिवलीमध्ये एका कंपनीत स्फोट झाला होता. त्यानंतर आता नागपूरमध्ये देखील अशी घटना घडली आहे. (हेही वाचा:Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसी मध्ये महिन्याभरात दुसर्यांदा भीषण स्फोट झाल्याने आग (Watch Video) )
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिथे आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दुर्घटनेनतंर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्फोटाची माहिती मिळताच कामगारांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांची गर्दी पहायला मिळत आहे. आमदार अनिल देशमुख घटनास्थळी दाखल झालेत. परिसरात स्फोटांचे मोठे आवाज येउ लागल्याने काहीराळ तेथे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.