Bank Robbery In Wardha: वर्धा येथील मुथुट फायनान्स शाखेवर दरोडा; रोख रक्कम, साडेतीन किलो सोने लुटले

यात दरोडेखोरांनी 3.18 लाख रुपयांची रोखड आणि तब्बल साडेतीन किलो सोने सोने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. धक्कादायक म्हणजे मुद्देमाल लुटल्यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांच्याच दुचाकी पळवून त्यावरुन पोबारा केला.

Robbery | Representational Image (Photo Credits: Pixabay)

वर्धा (Wardha) येथील मुथुट फायनान्स शाखेत आज दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा (Muthoot Finance Robbery in Wardha Branch) टाकला. यात दरोडेखोरांनी 3.18 लाख रुपयांची रोखड आणि तब्बल साडेतीन किलो सोने सोने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. धक्कादायक म्हणजे मुथुट फायनान्स (Muthoot Finance ) शाखा कार्यालयातील मुद्देमाल लुटल्यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांच्याच दुचाकी पळवून त्यावरुन पोबारा केला. ही घटना आज (गुरुवार, 17 डिसेंबर 2020) सकाळी 9 वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार, दरोडेखोर बँक कार्यालयात आले. त्यांनी थेट शाखा व्यवस्थापकाजवळ प्रवेश केला. शाखा व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावून त्यांनी चेंबर पेटी खोलली. त्यातून त्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली. दरोडेखोरांनी रोकड आणि सोपत सुमारे साडेतीन किलो सोनेही सोबत घेऊन पोबारा केला. या घटनेवेळी नेमके किती दरोडेखोर आले होते याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र, ही घटना सीटीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (हेही वाचा, Robbery In Kalyan: कल्याण पूर्वेत भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास)

दरोड्याची घटना घडताच शाखा व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही माहिती मिळतात तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासे आहे. तसेच, दरोडेखोरांच्य बोटांचे ठसेही घेतले आहेत. प्राप्त माहिती आणि पुराव्यांच्या आधारे त्यांनी दरोडेखोरांची रेखाचित्रेही तयार केली आहेत. पोलिसांनी सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तपासावेळी कोणताही दुवा कच्चा राहू नये यासाठी पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरु केली आहे.

दरोड्याच्या घटेमुळे केवळ वर्धा शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरीकांमध्ये घबराट आणि संशयाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. परंतू, परिसरात लोकचर्चा आणि अफवा ऐकायला मिळत आहेत.