Thane: मद्यपानाच्या सवयीमुळे लिव्ह इन पार्टनरची हत्या; आरोपीला अटक

पीडित 24 वर्षीय तरुणी वेश्याव्यवसाय करत होती. मात्र, भिवंडी येथील सद्दाम शरीफ सय्यद याला भेटल्यानंतर तिने हा व्यवसाय सोडून दिला होता.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Thane: आपल्या लिव्ह-इन पार्टनरची (Live-in Partner) हत्या केल्याप्रकरणी एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पीडित 24 वर्षीय तरुणी वेश्याव्यवसाय करत होती. मात्र, भिवंडी येथील सद्दाम शरीफ सय्यद याला भेटल्यानंतर तिने हा व्यवसाय सोडून दिला होता. कविता रामाप्पा मदार उर्फ मुस्कान ही कर्नाटकची असून ती गेल्या दोन वर्षांपासून सद्दामसोबत राहत होती. मृत व्यक्ती अनाथ होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दामचे कविताशी दारूच्या नशेवरून वारंवार भांडण होत होते.

भिवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चेतन काकडे यांनी सांगितले की, “22 सप्टेंबर रोजी कविता मद्यधुंद अवस्थेत सद्दामच्या फ्लॅटवर गेली. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात सद्दामने तिचा गळा दाबून खून केला.(हेही वाचा -Mumbai: मुंबईतील विलेपार्लेत अचानक सात घरं कोसळली, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ)

या सर्व प्रकारानंतर सद्दामने कविताच्या आजीला फोन करून सांगितले की, कविताने आत्महत्या केली आहे आणि तो तिचा मृतदेह गावी आणत आहे. रुग्णवाहिकेत मृतदेह घेऊन निघण्यापूर्वी आरोपीने शेजाऱ्यांसमोर तीच कहाणी पुन्हा सांगितली.

तथापि, शेजाऱ्यांना सद्दामचा संशय आला आणि त्यांनी भिवंडी पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर पोलिसांनी पुण्यात कविताचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली. शवविच्छेदनात ही हत्या असल्याचे उघड झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement