धारावी मध्ये आढळले 7 नवे COVID-19 रुग्ण, या परिसरात कोरोना बाधितांची संख्या 2,158 वर

परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई उपनगरातील अंधेरी, दादर, वरळी, दहिसर ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईत (Mumbai) सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या धारावी (Dharavi) परिसरात आज 7 नवे कोविड-19 चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,158 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. यासोबतच धारावी परिसरात आतापर्यंत एकूण 78 रुग्ण दगावल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 64,068 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे.

शहरातील धारावी हा आतापर्यंत कोरोनाचा हॉटस्पॉट होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबई उपनगरातील अंधेरी, दादर, वरळी, दहिसर ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. भायखळा येथील Richardson & Cruddas कंपनीच्या इमारतीत COVID-19 रुग्णांसाठी BMC कडून 1000 बेड्ससह क्वारंटाईन सेंटर तयार, Watch Photos

तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 124331 वर पोहचला असून एकूण 5893 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर 55651 रुग्णांवर उपचार सुरु असून 62773 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतामध्ये कोरोना बाधितांच्या आकड्याने 3.9 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर 12 हजार 948 जणांनी जीव गमावला आहे. आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 14 हजार 516 नवे रूग्ण समोर आले आहेत. ही आत्तापर्यंत एका दिवसात नवे रूग्ण समोर येण्याचा सर्वाधिक आकडा आहे.