Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

सोबतच आज मुंबईत यल्लो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आले आहे.

Mumbai Weather Prediction, August 03: मुंबई हवामान अपडेटमध्ये, भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच आज मुंबईत यल्लो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आले आहे.कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस व किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील.पुढील आठवडाभर ढगाळ आकाशासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.IMD ने सादर केलेल्या आकडेवारनुसार असे दिसून आले आहे की बुधवार ते गुरुवार सकाळ दरम्यान, सांताक्रूझ वेधशाळेने फक्त 2 मिमी पाऊस झाला, तर कुलाबा किनारपट्टी वेधशाळेने याच कालावधीत 3 मिमी पावसाची नोंद केली.IMD ने अंदाज वर्तवला आहे की शुक्रवारपासून पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे आणि पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

 

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

भारतीय हवामान खात्याने (IMD) मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेशात आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी अत्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, कोकण, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आसाम, मेघालय यासह देशातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे.