Mumbai Water Supply: मुंबईतील 'या' तीन विभागात 17 जानेवारीला पाणीपुरवठा राहणार बंद
भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या 1200 मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार 17 जानेवारीला हाती घेण्यात आले आहे.
मुंबईत (Mumbai) ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात 17 जानेवारी रोजी म्हणजेच उद्या सकाळी 10 ते दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद (Mumbai Water supply) करण्यात येणार आहे. तर या काळात जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी 1200 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन सदर ठिकाणी नवीन 1200 मि.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठ्यावर प्रभाव पडणार आहे. (हेही वाचा - Thane Water Supply News: रस्त्याचे काँक्रिटीकरण! ठाणे शहरातील घोडबंदर रोड परिसरात पुढचे 24 तास पाणीपुरवठा बंद)
मुंबईत नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असं आवाहन महापालिकेने केलं आहे. भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या 1200 मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार 17 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून ते गुरुवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 24 तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. सदर कामाच्या कालावधीत ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार आहे.
मुंबईतील विविध विभागातील पाणीपुरवठा प्रभावित होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पुरेश्या पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.