Mumbai Water Shortage: पाठिमागील वर्षाच्या तुलनेत मुंबईत यंदा कमी जलसाठा, मुंबईकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचे अवाहन
ऐकीकडे देशात लोकसभा निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना दुसरीकडे मुंबईसह देशात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. मुंबईकरांना, पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणीसाठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. जुलै महिना अखेरपर्यंत मुंबईला पाणीसाठी, पुरेल अशा रीतीने नियोजन करण्यात येत आहे. यामुंळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर हा कमी करावा तसेच त्याच्या अयोग्य वापर टाळावा असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा - Mumbai Water Cut: पंजरापूर प्लांटमध्ये तांत्रिक समस्या; बीएमसीकडून मुंबई शहरातील काही भागांसह सर्व पश्चिम उपनगरांमध्ये पाणीकपात जाहीर (Check Affected Areas))
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील सध्या उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. मुंबईला सात जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सात जलाशयांमध्ये मिळून सध्या 2 लाख 38 हजार 552 दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर गरजेच्या तुलनेत हा साठा 16.48 टक्के आहे. त्याचप्रमाणे, भातसा धरणातून 1,37,000 दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून 91,130 दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.
पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता, सध्या मुंबईत कोणतीही पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी करण्याचं कारण नाही. असं असलं तरी, प्रशासनाने केलेल्या नियोजनाला मुंबईकरांचे देखील सहकार्य केलं पाहिजे. पाण्याचा सर्वांनी काटकसरीने वापर करा, पाणी बचतीच्या उपायांचा अवलंब करा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.