Mumbai: वाहतुक पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक; रिक्षात विसरलेली कॅश आणि 13 तोळे सोन्याने भरलेली बॅग केली परत

मुंबई पोलिसांचे धैर्य, कर्तृत्व, कामगिरी सर्वश्रुत आहे. अनेक घटनांमधून ते सिद्ध झाले आहे. आज मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणाचा दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. एका वाहतुक पोलिसाला रिक्षात एक पैशाने आणि 35 तोळे सोन्याने भरलेली बॅग मिळाली.

बॅग आणि वाहतुक पोलिस (Photo Credits-ANI Twitter)

मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) धैर्य, कर्तृत्व, कामगिरी सर्वश्रुत आहे. अनेक घटनांमधून ते सिद्ध झाले आहे. आज मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणाचा दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. एका वाहतुक पोलिसाला रिक्षात एक पैशाने आणि 13 तोळे सोन्याने भरलेली बॅग मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बॅगची मालकीण असलेल्या महिलेचा शोध घेतला आणि बॅग तिच्याकडे सुपूर्त केली. या बॅगमध्ये तब्बल 10 लाखांचे सोने होते. या घटनेनंतर या पोलिस कर्मचाऱ्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबद्दल बोलताना वाहतूक पोलिसाने सांगितले की, "रिक्षामध्ये एक महिला बॅग विसरली होती. त्यात 13 तोळे सोने आणि पैसे होते. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहून ऑटोरिक्षाचा नंबर शोधण्यात आला. बॅगच्या मालकाचा नंबर शोधून संपर्क केला आणि बॅग त्यांच्या स्वाधीन केली."

ANI Tweet:

(हे ही वाचा: Mumbai Police: अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुरडीची 48 तासांत सुटका; मुंबई पोलिसांनी शेअर केला मायलेकीच्या पुनर्मिलनाचा भावूक क्षण)

वाहतुक पोलिस अधिकारी प्रदीप मोरे यांनी सांगितले की, "बॅगच्या मालकीनीने पोलिस स्टेशनमध्ये जावून बॅग तपासली तेव्हा सर्व वस्तू, पैसे तसेच होते. त्यानंतर महिलेने पोलिसांचे आभार मानलेय तसंच वरिष्ठांकडून पोलिस कर्मचाऱ्याला शाबासकीची थाप मिळाली असून अशा प्रकारचे काम करण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement