Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोमुळे मेट्रो प्रवाशांना सहन करावा लागला नाहक त्रास, घाटकोपर स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी
सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी मुंबई मेट्रो सेवा अंशत: बंद ठेवण्यात आली होती आणि वाहतुकीवर परिणाम झाला होता, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली
सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी मुंबई मेट्रो सेवा अंशत: बंद ठेवण्यात आली होती आणि वाहतुकीवर परिणाम झाला होता, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. "सुरक्षेच्या कारणास्तव, जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानकांदरम्यान, संध्याकाळी 06.00 वाजेपासून पुढील सूचना येईपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवली जाईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत," असे मुंबई मेट्रोने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. दुपारी 2.55 वाजता पोस्ट करण्यात आली. मुंबई वाहतूक पोलिसांनी एका पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित रोड शोमुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग, ईस्टर्न एक्स्प्रेस वे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर दुपारी 2 ते 10 या वेळेत वाहतूकीत बदल करण्याच आले होते. (हेही वाचा - PM Narendra Modi Road Show In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई मधील रोड शो ला सुरूवात)
पाहा पोस्ट -
X वर शेअर केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये संध्याकाळी घाटकोपर मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी दिसून आली कारण अनेकांनी मुंबई मेट्रोच्या उशिरा नोटिफिकेशनची तक्रार केली. घाटकोपर पुलावरील गर्दीचा व्हिडिओ शेअर करत एका एक्स वापरकर्त्याने सांगितले की, "मार्ग बदलल्यामुळे घाटकोपर पुलावर ही भयानक परिस्थिती निर्माण झाली कारण मेट्रो बंद होती आणि तेथे कोणीही पोलीस अधिकारी उभे नव्हते." "तुम्ही काल ही नोटीस का काढली नाही? आता घाटकोपर मेट्रो स्टेशनवर अडकलेल्या लोकांचे काय? चेंगराचेंगरी झाली तर जबाबदार कोण?" असे एका वापरकर्त्याने विचारले.
पाहा पोस्ट -
आठ नंतर मुंबई मेट्रोने सांगितले की घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान पूर्ण सेवा पुन्हा सुरू झाली. "फ्रिक्वेंसी 10 मिनिटांत सामान्य होईल. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत," मुंबई मेट्रोने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे