मुंबई: चेंबूर मध्ये भरदिवसा वाहतूक पोलिसाचं अपहरण करण्याचा प्रयत्न, आरोपीला ठोकल्या बेड्या

चेंबूर मधील छेडा नगर परिसरात,दारुच्या नशेत भर रस्त्यात कार थांबवून वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या तिघा तरुणांना हटकणाऱ्या वाहतूक पोलिसाचेच अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Image For Representation (Photo Credits-Facebook)

आपले काम चोख करताना अनेकदा पोलिसांना कुप्रवृत्तीच्या नागरिकांचा त्रास सहन करावा लागतो, असाच काहीसा प्रकार चेंबूर  (Chembur) मध्ये घडला आहे. दारूच्या नशेत बेधुंद होऊन गाडी चालवणाऱ्या तिघांच्या ग्रुपला ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाने हटकले असता या ग्रुपने अक्षरशः फिल्मी स्टाईलने या पोलिसाचेच अपहरण केल्याची घटना समोर येत आहे. चेंबूर मधील छेडा नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. याबाबत माहिती मिळताच अन्य पोलिसांनी पूर्व द्रुतगती मार्गावरून (Eastern Expressway)  या अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला आणि पंधरा मिनिटाच्या थरारनानंतर अखेरीस या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

प्राप्त माहितीनुसार, छेडा नगर येथे मंगळवारी सकाळी, दारूच्या नशेत असणारी तीन तरुण गाडीतून जात होते, यातील गाडी चालवणाऱ्या तरुणाने अचानक भररस्त्यात गाडी थांबवली, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला, हे तरुण नशेत आहेत याचा अंदाज येताच त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या मुंडे या वाहतूक पोलिसाने अन्य दोन पोलिसांसोबत जाऊन या तरुणांना हटकले, तसेच गाडी बाजूला घेण्यास सांगितले, अशा वेळी अनेकदा ही नियम तोडणारी मंडळी गाडी वेगाने चालवून पळ काढतात, असे करण्यापासून त्यांना रोकण्यासाठी मुंडे त्यांच्या गाडीत बसले. त्यानंतर या तरुणांनी गाडी बाजूला न घेता थेट वेगाने पळवली. आणि मागच्या बाजूस बसलेल्या दोघांनी मुंडे यांना मारहाण सुद्धा केली . आंध्र प्रदेश: गळा चिरुन तिघांची हत्या, मंदिरात केले रक्ताचे शिंपण; भयानक प्रकाराने पोलिसही हादरले 

यानंतर तिथेच उपस्थित असलेल्या सहायक पोलीस आयुक्त वेंकट पाटील यांच्या पथकाने पोलिसांच्या जीपमधून या गाडीचा पाठलाग केला. पंधरा मिनिटांनंतर पूर्वद्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे कार अडवून त्यातील दोन तरुणांना अटक केली. एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. प्रेयसीला अडवण्यासाठी त्याने पसरवली चक्क विमान अपहरणाची अफवा; झाली जन्मठेप आणि 5 कोटीची शिक्षा

 दरम्यान, या अपहरणकर्त्या तरुणांची ओळख विराज शिंदे, गौरव पुंजवानी आणि राज अशी पटली आहे. त्यांच्यापैकी विराज आणि गौरव यांना ताक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे तर राज अद्याप फरार आहे. यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif