Mumbai Threat Call: मुंबईचा हाजीअली दर्गा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
काल दुपारी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक निनावी फोन आला ज्यात मुंबईत सतरा दहशतवादी येणार असुन ते हाजी अली दर्गा त्यांच्या निशाण्यवर आहे अशी माहिती मिळाली आहे.
मुंबईने (Mumbai) यापूर्वीही अनेक दहशतवादी हल्ले पचवले आहेत. पण आता मुंबई (Mumbai) एकदा पुन्हा प्रामुख्याने दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचं चित्र आहे. कारण गेले काही महिन्यात मुंबई पोलिसांना विविध माध्यमातून मुंबई दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचे धमक्या आल्या आहेत. तरी यावेळी मुंबईतील सुप्रसिध्द धार्मिक स्थान हाजी अली दर्गा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचं चित्र आहे. काल दुपारी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला (Mumbai Police Control Room) एक निनावी फोन आला ज्यात मुंबईत (Mumbai) सतरा दहशतवादी येणार असुन ते हाजी अली दर्गा त्यांच्या निशाण्यवर आहे अशी माहिती मिळाली आहे. तरी हा निनावी फोन कुणाचा याबाबत मुंबई पोलिस (Mumbai Police) सखोल तपास करीत आहेत. तर या हा फोन उल्हासनगर (Ulhasnagar) भागातून आला असुन संबंधित तपास सुरु आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.
हाजी अली दर्गावरील (Haji Ali Dargah) दहशतवादी हल्ल्याच्या फोन नंतर मुंबई पोलिस (Mumbai Police) यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या फोननंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्यासह (Haji Ali Dargah) आजूबाजूच्या संपूर्ण परिसराची विस्तारीत तपासणी केली आहे. बाजूला सुरु असलेल्या एल अँड टीच्या प्रोजेक्ट (L&T Site) साइटवरही सगळा भाग शोधून काढला असला तरी पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. तरी परिसरातील नागरिकांनी सतर्क वागावं तसेच कुठलीही संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास मुंबई पोलिसांना कळवण्यास सांगितले आहे. (हे ही वाचा:- Long Tunnel Found in Byculla: मुंबईतील जे.जे रुग्णालयात ब्रिटीशकालीन भुयार, Watch Video)
धमकीचा फोन काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला होता. तेव्हापासून पोलिसांचा तपास सुरु आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही. ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.