G-20 Meeting: G20 कार्यक्रमापूर्वी मुंबईच्या झोपडपट्ट्या चादरीने झाकल्या, मुंबईचे वास्तव लपविण्याचा प्रयत्न केल्याचा रहिवाशांचा आरोप
एका रहिवाशाने सांगितले की, काही लोक रात्री शेजारी साफसफाई करत होते, त्यांनी हे पडदे लावले. आम्हाला सकाळीच त्यांच्याबद्दल कळले. काही खास पाहुणे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताने 1 डिसेंबरपासून औपचारिकपणे G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. याच भागात या आठवड्यात तीन दिवसीय शिखर परिषदेसाठी G-20 देशांचे प्रतिनिधी मुंबईत (Mumbai) आले आहेत. G-20 परिषदेसाठी भारताने उत्कृष्ट तयारी केली आहे. त्याचवेळी असे चित्रही समोर आले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. G-20 परिषदेपूर्वी प्रशासन आणि सरकारने शहरातील काही गरीब भागांना चादरीने झाकले आहे. रस्त्यावरून जाताना कुणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने हे भाग झाकण्यात आले आहेत. येथील रहिवाशांनी एनडीटीव्हीला सांगितले की, शहराच्या सुशोभिकरणासाठी त्यांच्या वसाहती रात्रभर चादरीने झाकल्या गेल्या.
एका रहिवाशाने सांगितले की, काही लोक रात्री शेजारी साफसफाई करत होते, त्यांनी हे पडदे लावले. आम्हाला सकाळीच त्यांच्याबद्दल कळले. काही खास पाहुणे येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जे लोक स्वच्छता करण्यासाठी येतात, ते फक्त रस्त्यांच्या आजूबाजूच्या भागांची स्वच्छता करतात. गेल्या 50 वर्षात अशी स्वच्छता मोहीम आम्ही कधीच पाहिली नाही, असे आणखी एका रहिवाशाने सांगितले, ज्याने मुंबईचे वास्तव लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. हेही वाचा निम्मं घर महाराष्ट्रात निम्मं घर तेलंगणात; चंद्रपूरातील Maharajguda गावातील Uttam Pawar यांच्या घराची गजब कहाणी
ताजमहाल पॅलेस हॉटेल देखील सजवले गेले होते. त्याचवेळी G20 चे काही प्रतिनिधी ढोल वाजवत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आनंद लुटताना दिसले. या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत हे उपस्थित होते. गेटवे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्रातील लोकनृत्य आणि संगीत परंपरा दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.
भारताच्या G20 अध्यक्षतेखाली डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप (DWG) ची पहिली बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. तीन दिवसीय विकास कार्यगटाची बैठक शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) वरील प्रगतीला गती देण्यासाठी G20 सामूहिक कृतींवर लक्ष केंद्रित करेल आणि अन्न, इंधन आणि खत सुरक्षेशी संबंधित तातडीच्या चिंतांना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांना समर्थन देईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)