Mumbai Shocker: विक्रोळीत रस्त्यावर फटाके उडवण्यावरून हटकलेल्या महिलेसोबत 30 वर्षीय व्यक्तीचं गैरवर्तन, मारहाण; आरोपी फरार

लहान मुलांसोबत फटाके फोडणार्‍या 30 वर्षीय व्यक्तीने समाजसेविकेवर वादातून हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Firecracker | Representative Image

भारतामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. सर्वत्र आनंदाचं, जल्लोषाचं वातावरण असतं. मुंबई मध्ये मात्र या मंगलमय वातावरणात एका महिलेने फटाके उडवण्यावरून हटकलं असता तिला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार रस्त्यावर फटाके लावण्यावर आक्षेप घेणार्‍या महिलेचं नाव प्रीती गायकवाड आहे. प्रीती विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात राहते. लहान मुलांना प्रीतीने फटाके फोडण्यावरून हटकल्यानंतर तिच्यासोबत काही जणांनी गैरवर्तणूक केल्याचं समोर आलं आहे.

Hindustan Times,च्या रिपोर्टनुसार, हा प्रकार 10 नोव्हेंबरच्या रात्रीचा आहे. 52 वर्षीय प्रीती समाजसेविका आहे. त्यांनी विक्रोळीत रस्त्यावर फटाके फोडण्यावर आक्षेप घेतला. तिच्या तक्रारी मध्ये दिलेल्या माहितीनुसार, घरी परतत असताना तिने काही मुलांना फटाके लावताना पाहिलं. त्या मुलांच्या फटाके फोडण्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचं आणि ट्राफिक जाम होत असल्याचं तिने म्हटलं आहे. Bombay HC On Firecrackers: यंदा मुंबईकरांना फक्त दोन तासच फटाके फोडता येणार, हायकोर्टाने दिला आदेश; जाणून आतिषबाजीची वेळ .

30 वर्षीय व्यक्ती या लहान मुलांसोबत फटाके वाजवत होता. प्रीती यांनी हटकल्यानंतरही त्यांचे फटाके वाजवणं सुरू होतं. या 30 वर्षीय प्रदीप नामक व्यक्तीने नंतर जळते फटाके प्रीतीच्या दिशेने भिरकावले. तिने नेम चुकवला आणि त्याला उलट सवाल केला. तेव्हा प्रदीपने हा प्रकार चुकून झाल्याचं म्हटलं पण नंतर पुढच्याच क्षणी तो हसायला लागला. यामुळे प्रीतीचा संताप अनावर झाला. पुन्हा तिने सवाल केला तेव्हा त्यांच्याच वाद झाला. मग प्रीतीने रिक्षात थांबवत त्याच्यासह विक्रोळी पोलिस स्टेशन गाठलं.

रिक्षामध्ये प्रदीप प्रीतीसोबत बसला पण जसं पोलिस स्टेशन जवळ येत होतं तसं तो पुन्हा वाद घालायला लागला. प्रीतीचे केस पकडून तिचं डोकं त्याने रिक्षात लोखंडी रॉड वर आपटलं आणि रिक्षातून पळ काढला. प्रीतीने नंतर पोलिसांत याबाबत रीतसर तक्रार केली. अद्याप आरोपी प्रदीप फरार आहे.