Mumbai Shocker: माणुसकीला काळीमा फासणारी घटना! टॉयलेटमधील कचऱ्याच्या पिशवीत सापडला नवजात बालिकेचा मृतदेह, सायन रुग्णालयातील थरार
या घटनेनंतर रुग्णालयात काही तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सायन रुग्णालयातील टॉयलेट रुममध्ये एक नवजात बालिकेचा मृतदेह (Death body) आढळला.
Mumbai Shocker: मुंबईतील सायन (Sion) रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात काही तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सायन रुग्णालयातील टॉयलेट रुममध्ये एक नवजात बालिकेचा मृतदेह (Death body) आढळला. या घटनेची माहिती रुग्णालयात पसरताच मोठी खळबळ उडाली आहे. जन्मत:च त्या बालिकेला टॉयलेटमधील कचऱ्याच्या पिशवीत फेकून दिले आहे अशी माहिती वरिष्ठांकडून मिळाली आहे.(हेही वाचा- वसई हादरली! बेपत्ता अल्पवयीन मुलीचा बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह)
मिळालेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबरच्या सकाळी टॉयलेट साफ करण्यासाठी आलेल्या मावशींना या घटनेची माहिती मिळाली. नेहमी प्रमाणे त्या रुम साफ करण्यासाठी आल्या होत्या. टॉयलेट रुममधील कचरा पिशवी गोळा करत असताना एक कचरा पिशवी वजनाने जड वाटल्याने काही तरी गडबड असल्याचे समडले. त्यावेळी पिशवी उघडून पाहिले तर नवजात बालिकेचा मृतदेह आढळून आला. हे पाहून त्यांच्या पाया खालील जमिन सरकली. त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.
डॉक्टरांनी बालिकेला तपासले परंतु तीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची संपुर्ण माहिती शीव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अज्ञांत महिलेविरुध्दात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या संदर्भात पोलिस कसून चौकशी करत आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेता प्रश्न उभा राहिला आहे.