Mumbai- Pune Traffic Update: मुंंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ उलटला तेलाचा टॅंकर, वाहतुक विस्कळीत

मुंंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express Way) वर भोर घाट (Bhor Ghat) येथील बाहेर पडण्याच्या मार्गावर खोपोली (Khopoli) जवळ तेलाचा टॅंंकर (Oil Tanker) उलटल्याची घटना समोर येत आहे,

Mumbai Pune Expressway (Photo Credits: Facebook)

मुंंबई पुणे एक्सप्रेस वे  (Mumbai Pune Express Way) वर भोर घाट (Bhor Ghat) येथील बाहेर पडण्याच्या मार्गावर खोपोली (Khopoli) जवळ तेलाचा टॅंंकर (Oil Tanker) उलटल्याची घटना समोर येत आहे, परिणामी मुंंबईकडे येणारी वाहतुक विस्कळीत (Traffic Update)  झाली आहे. ही घटना साधारण 12 वाजताच्या सुमारास घडली आहे. मात्र तेलाचा टॅंकर उलटल्याने या रस्त्यांंवर बरीच तेलगळती झाली आहे ज्यामुळे रस्ता निसरडा झाला असुन पुढील काही तास वाहतुकीसाठी बंद असणार आहे. सुदैवाने या अपघातात टॅंकरच्या चालकाला कोणतीही हानी झालेली नाही तसेच रस्त्यावर कमी वाहतुक असल्याने जीवितहानी सुद्धा झालेली नाही मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तेल गळतीमुळे आर्थिक नुकसान बरेच झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार सध्या भोर घाटातील तिन्ही मार्गांंवर तेल पसरले आहे आणि मुंंबईकडे येणार्‍या रस्त्यावर 5 किमी पर्यंत ट्रॅफिक जाम झाले आहे. या भागात सध्या पोलिसांंनी वाहतुक जुन्या मुंंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वळवण्याचे काम हाती घेतलेय. या मार्गावरुन वाहतुक पुन्हा कधी सुरु होईल याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, मुंंबई पुणे एक्सप्रेस वे हा अपघातप्रवण भाग म्हणुन ओळखला जातो. रस्ते बांंधणी मध्ये अनेक सुधारणा करुनही तसेच वाहनांंच्या वेगावरील नियंंत्रणाचे सरकारी नियम असतानाही अनेकदा वाहन चालकांंच्या घाई मुळे तसेच या रस्त्यावरील वाहनांंच्या गर्दीमुळे इथे अपघात होत असतात. मागील काळात लॉकडाउन मुळे मात्र हे प्रमाण किंंचित घटले होते.