मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे 9 ऑक्टोबरला काही काळासाठी राहणार बंद

उद्या मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे.

Mumbai- Pune Expressway (Photo Credits: Twitter)

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे 9 ऑक्टोबर (बुधवार) रोजी तांत्रिक कामानिमित्त काही काळ बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला असून उद्या मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आल्याने एक्स्प्रेस वे बंद असणार आहे.

या 2 तासांत सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्स्प्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी 52.00 कि. मी. अंतरावर थांबवण्यात येतील तर हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने ही कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.