Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्‍झीटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे.

Mumbai Pune Expressway (Photo Credits: x/@CivilEngDis)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) खोपोली एक्झिटपासून (Khopoli Exit) मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरील वाहतुक बंद राहणार असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं अवाहन महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना केले आहे. हा मार्ग बंद ठेवण्यात असल्यामुळं खोपीली एक्झिटजवळच तीन पदरी पर्यायी मार्गाचा वापर मुंबईला जाण्यासाठी वापरावा, असं अवाहन करण्यात येत आहे  (हेही वाचा -Block on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या मेगाब्लॉक; हलक्या आणि जड वाहनांसाठी 'हा' असेल पर्यायी मार्ग)

पुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्‍झीटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे. मुंबईला जाण्‍यासाठी पर्यायी मार्ग म्‍हणून खोपोली एक्‍झीटजवळ नवीन तीनपदरी मार्ग तयार करण्‍यात आला असून तो आजपासून वाहतूकीसाठी खुला करण्‍यात आला आहे. मुंबईकडे जाणारया प्रवाशांना या मार्गाचा वापर करता येईल. मुंबईला जाणारया प्रवाशांनी खोपोली एक्‍झीट पूर्वी साइन बोर्ड बघून डाव्‍या बाजूने प्रवास करावा असे महामार्ग पोलीसांकडून आवाहन करण्‍यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते.