Mumbai MHADA Lottery 2022: मुंबईत घर घेण्याचं स्वप्न लवकरचं पूर्ण होणार, कोकण म्हाडाच्या घरांची पुढील महिन्यात सोडत

Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबईत (Mumbai) खायला अन्न, हाताला काम मिळणं सोप पण राहायला झप्पर मिळणं सगळ्यात कठीण. किंबहुना मुंबईतील ज्या ७० टक्के रोजगार वर्गामुळे सगळी काम अगदी मिनिटांत होतात त्याचं कामगाराकडे मुंबईत स्वतचं घर नाही ही मुंबईची शोकांतीका आहे. मुंबई घर घेण्याच स्वप्न बघत तरुण्यावस्थेतून वृध्द अवस्थेत आले पण मायानगरीत घर हे स्वप्नचं राहिलं. पण सिडको आता हे स्वप्न साकार करण्यास मुंबईकरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. वर्षात किमान दोन ते तीन वेळेस मुंबईतील म्हाडाच्या घराची (Mumbai MHADA Lottery 2022) सोडत निघते. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये मुंबई म्हाडा (Mumbai MHADA) कडून जवळपास 9 हजार घरांची सोडत काढली होती त्यासाठी 46 हजारांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले होते. तरी आता पुन्हा एकदा कोकण म्हाडाची (Konkan MHADA) डिसेंबरमध्ये (December) सोडत काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

कोकणा म्हाडा (Konakan MHADA) म्हणजे ठाणे (Thane), कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli), नवी मुंबई (Navi Mumbai), वसई-विरार (Vasai-Virar) या भागात घरांची सोडत काढल्या जाणार आहे. ही घर मुंबईत (Mumbai) नसून मुंबई उपनगरात असल्याने ही सर्वसामान्याना परवडणाऱ्या भावात उपलब्ध असतील. तरी तुम्ही म्हाडाच्या (MHADA Lottery) या लॉटरीत किंवा मुंबई नजिकच्या उपनगरात घर घेण्यास उत्सुक असाल तर हो ही सोडत तुमच्यासाठी आहे. कोकण म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची सविस्तर माहिती लवकरच म्हाडा कडून अधिकृतरित्या घोषित करण्यात येईल. (हे ही वाचा:- Airbus Beluga At Mumbai: जगातील सर्वात मोठं विमान मुंबईत दाखल! एअरबस बेलुगा विमानाचं मुंबई विमानतळावर लॅंडिंग)

 

तसेच म्हाडा पाठोपाठ सिडकोच्या (CIDCO) चार हजार घरांची आज सोडत निघणार आहे. पण सिडकोच्या सोडतीसाठी यावेळेस फक्त सोळा हजार अर्ज आले आहेत. लांखाच्या घरात येणाऱ्या अर्जांची संख्या केवळ सोळा हजारांवर येण्याचं कारण म्हणजे अव्वाच्या सव्वा वाढवलेली किंमत. तरी म्हाडाची घर मात्र अजूनही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. तरी पुढील महिण्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये (December) कोकण म्हाडाच्या घरांची सोडत असणार आहे.



संबंधित बातम्या