Mumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर, आता एकाच तिकीटावरून करता येणार वेगवेगळ्या मार्गिकांवर प्रवास

घाटकोपर-वर्सोवा ही राज्यातील पहिली मेट्रो मार्गिका अखेर एमएमआरडीएच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे मार्गिका खरेदी करण्याचे पाच वर्षांपासूनचे भिजत घोंगडे असलेला हा निर्णय अखेर मार्गी लागला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या निर्णयाला अखेर सोमवारी मंजुरी दिली.

Metro (PC- Wikimedia Commons)

Mumbai Metro : मुंबईत मेट्रो सुरु झाल्यापासून मेट्रोला प्रवाशांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, आजूनही मुंबईकरांना मेट्रोच्या (Mumbai Metro ) वेगवेगळ्या मार्गीकांचे तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागत आहे. आता मेट्रोच्या सर्व मार्गांचे एक तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या मुंबईत मेट्रो १ शिवाय मेट्रो २ अ व मेट्रो ७ (गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे दहिसर) या मेट्रो मार्गिका सुरू झाल्या आहेत. मोठया संख्येने मुंबईकर प्रवास करत आहेत. मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका एमएमआरडीएकडे असल्याने त्या मार्गाचे संयुक्त तिकीट (Metro Ticket) काढता येते. परंतू मेट्रो १ मार्गिकेसाठी वेगळे तिकीट काढावे लागत होते. आता मात्र सर्व मार्गांचे एकच तिकीट मिळणार आहे. (हेही वाचा :Navi Mumbai Metro: जवळजवळ 68,000 हून अधिक प्रवाशांनी केला नवी मुंबई मेट्रोने प्रवास; केवळ 5 दिवसांत वाहतूक समस्या झाली कमी)

मेट्रो १, मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिका गुंदवली व अंधेरी पश्चिम या स्थानकाजवळ संलग्न होतात. मात्र तसे असतानादेखील मेट्रो १ चे तिकीट स्वतंत्र काढावे लागते होते. कारण, मोट्रो १ ही राज्य सरकारच्या ताब्यात होती. आता ही मार्गिका एमएमआरडीएकडे आल्यानंतर घाटकोपर-वर्सोवा (Ghatkopar-Versova Metro )व गुंदवली ते अंधेरी पश्चिम या तिन्ही मार्गिकांवरील स्थानकांचे एकत्रित तिकीट प्रवाशांना काढता येईल. ही मार्गिका खरेदी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement