मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे महिलांसोबत कथित गैरवर्तन, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Watch Video)

यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर सांताक्रुझ (Santacruz) येथील पटेलनगर भागातील काही घरात गेल्या 72 तासांपासून पाणी शिरल्याची स्थिती निर्माण झाली. याच ठिकाणी दोन जणांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Bmc Mayor Vishwanath Mahadeshwar | (Photo Credits: Facebook)

मुंबईत (Mumbai) झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर सांताक्रुझ (Santacruz) येथील पटेलनगर भागातील काही घरात गेल्या 72 तासांपासून पाणी शिरल्याची स्थिती निर्माण झाली. याच ठिकाणी दोन जणांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

त्यानंतर मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी या विभागात भेट दिली. मात्र या वेळी संतप्त झालेल्या स्थानिकांनी महाडेश्वर यांची गाडी अडवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या वेळी महाडेश्वर यांनी माझ्यासोबत दादागिरी करुन नका असे कथित रुपात धमकावले असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे.(छे.. छे... 'मुंबईत पाणी तुंबलंच नाही'; महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा अजब दावा)

तसेच पटेलनगर मधील स्थानिक रहिवाशांनी त्यांना होणाऱ्या समस्या सांगताना दिसून आले. मात्र महाडेश्वर यांना आपल्यावर होणाऱ्या प्रश्नांच्या भाडीमारामुळे राग आल्याचे दिसून आले. या रागाच्या भरात कथित रुपात त्यांनी एका महिलेचा हात पिरगळा असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे नागरिकांनी महाडेश्वर यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके

India Women vs West Indies Women, 1st T20I Match Live Toss Update: वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI