मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे परिसरात पावसाला सुरुवात
कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आहे. कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये ठिणग्या उडत आहेत.
मुंबई, ठाण्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकल्स अनेक स्थानकांत थांबल्या आहेत. तसेच काही स्थानकात जलद मार्गावरील ट्रेन्स देखील धीम्या मार्गावरून चालवल्या जात आहेत. परिणामी मध्य रेल्वेचं वेळापत्रक बिघडलं आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आहे. कोपर स्थानकामध्ये पेंटाग्राफमध्ये ठिणग्या उडत आहेत.
उद्या (11 जून) दिवशी हे कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायू चक्रीवादळामुळे उद्या मुंबई, ठाणेसह कोकण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने या काळात मच्छिमार्यांनी अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement