Mumbai Fire: माझगाव येथील GST भवन मध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई (Mumbai ) मधील भायखळा (Byculla) परिसरात माझगाव (Mazgaon) येथे स्थित जीएसटी बिल्डिंगच्या (GST Building) आठव्या मजल्यावर आज, सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याचे समजतेय

Mumbai Fire (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai ) मधील भायखळा (Byculla) परिसरात माझगाव (Mazgaon) येथे स्थित जीएसटी बिल्डिंगच्या (GST Building)  आठव्या मजल्यावर आज, सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याचे समजतेय. या बाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यावर असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आगीचे  कारण जरी समजू शकले नसले तरी या परिसार्ट दिसणाऱ्या धुरावरून आगीचे सुस्वरूप हे अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होतेय. सुदैवाने यावेळी बिल्डिंग मध्ये कोणीही अडकलेले नाही तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी  झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

प्राप्त माहितीनुसार, GST बिल्डिंगला तिसऱ्या स्तरावरील भीषण आग लागल्याचे समजतेय, बिल्डिंग मधून दुपारच्या सुमारास धुराचे लोट उसळत होते, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही महत्वाची सरकारी इमारत असल्याचे येथील कागदपत्रां सहित महत्वाच्या दस्तऐवजांची हानी झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.

ANI ट्विट

दरम्यान, मागील काही काळात मुंबई सह आसपासच्या परिसआरत अनेक ठिकाणी आगीच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अलीकडेच अंधेरी MIDC परिसरातील रॉल्टा टेक्नॉलॉजी पार्क (Rolta Technology Park) येथे 13 फेब्रुवारी रोजी दुपारी भीषण आग (Fire) लागली होती, या घटनांमध्ये जरी जीवित हानी झाल्याचे प्रकार घडत नसले तरी इमारतींचे मोठे नुकसान होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif