Mumbai Fire: मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग; अग्निशमनदलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

कोरोना विषाणूने संपूर्ण सर्वत्र धुमाकूळ घातला असताना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले आहे. क्रॉफर्ड मार्केटमधीस सीपीओ ऑफिसजवळ आज मोठी आग लागल्याची समजत आहे

Fire at Crawford Market (Photo Credits: Twitter)

कोरोना विषाणूने संपूर्ण सर्वत्र धुमाकूळ घातला असताना मुंबईतील (Mumbai) क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) परिसरातील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले आहे. क्रॉफर्ड मार्केटमधीस सीपीओ ऑफिसजवळ आज मोठी आग लागल्याची समजत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आग्निशमन दल्याच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

मुबंईतील ज्या परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते क्रॉफर्ड मार्केट त्यापैकी एक आहे. परंतू, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे क्रॉफर्ड परिसरातील लागलेल्या आगीत मोठी जीवीतहानी झाली नाही. सध्या ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. हे देखील वाचा- Coronavirus Cases In Dharavi: धारावीत आज 2 जणांचा मृत्यू तर 20 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

पाहा व्हिडिओ-

एएनआयचे ट्वीट- 

 

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या आहेत की, या आगीमुळे क्रॉफर्ड मार्केट परिसरात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शॉट सर्कीटमुळे ही आग लागली आहे, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement