मुंबईकरांनो पाण्याची चिंता नको! पाणीपुरवठा करणार्‍या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात ऑक्टोबर पर्यंत पुरेल इतका साठा जमा

सोमवारी 3,39,067 दशलक्ष लिटर पाणी तलावात जमा झाले आहे,

Image For Representation/ Vihar Lake (Photo Credits: Twitter/ ANI)

यंदा देशभरात सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडेल असे अंदाज हवामान खात्याने (IMD)  वर्तवले होते, त्यानुसार मान्सूनच्या (Monsoon In Mumbai)  सुरुवातीपासूनच देशभरात आवश्यक तितका पाऊस होत आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईतील आकडेवारी पाहिल्यास जुलै महिन्याच्या सुरुवातीला या महिन्याच्या साठी अपेक्षित 60 % पाऊस झाला होता असे सांगण्यात आले होते. यात आणखीन एक महत्वाची आणि आनंदाची बातमी हाती येत आहे, ती म्हणजे, मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस सुरू आहे. सोमवारी  3,39,067  दशलक्ष लिटर पाणी तलावात जमा झाले आहे, त्यामुळे सध्याचा उपलब्ध पाणी साठा हा ऑक्टोबर मध्य पर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे येत्या वर्षात मुंबईकरांना पाणी कपातीची चिंता सतावणार नाही हे तरी निश्चित आहे.

दुसरीकडे कालच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या गुरुवार पर्यंत म्हणजेच 16 जुलै पर्यंत मुंबई,ठाणे , रायगड मधील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार आहे. अजूनही मान्सूनचे महिने बाकी असल्याने तलाव पूर्ण भरतील अशीही आशा आहे.

AIR ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील पवई येथील तलाव ओसंडून वाहू लागला होता, मात्र या तलावातील पाणी विशेषतः औद्योगिक कामांसाठी वापरले जात असल्याने त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत नाही.