मुंबई: CAA निषेधार्थ धरणे आंदोलनासाठी आझाद मैदान परिसरात वाहतुकीत बदल, मुंबई पोलिसांनी जारी केली Advisory
आज 27 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरुद्ध धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलीसांकडून Advisory जारी करण्यात आली आहे. या सूचनेनुसार दुपारी 2.30 ते संध्यकाळी 7.00 पर्यंत आझाद मैदान परिसरातून वाहतूक व्यवस्था दुसऱ्या दिशेने वळवण्यात आली आहे.(हे ही वाचा - मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ आझाद मैदानात उतरले आसामचे रहिवाशी; अभिनेत्री दीपानिता शर्मा सुद्धा आंदोलनात सहभागी)
प्राप्त माहितीनुसार, वाहतुकीच्या बदलाशिवाय काही भागात पूर्णतः पार्किंग बंदी करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका मार्ग, बदद्रुद्दीन तय्य्यबजी मार्ग, डी. एन. मार्ग, एम. जी.मार्ग, हझारिमल सोमानी मार्ग, एल. टी. मार्ग या ठिकाणी सरकारी वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या व स्थानिकांची वाहने सोडून सर्व वाहनांना पार्किंग बंदी असणार आहेत.
मुंबई पोलीस ट्विट
दरम्यान, नागरिकत्व दुरूस्ती कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर अजूनही काहीठिकाणी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतातून या कायद्याला तीव्र विरोध करण्यात येत आहे. याचेच उदाहरण म्हणजे 15 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे इतके तीव्र पडसाद उमटले आहेत की हे विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.