Mumbai Air Quality: मुंबईतील हवा प्रदुषित, शहरातील हवेची गुणवत्ता आणखीचं खालावली
मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 245 वर गेला आहे.
मेट्रो शहरातील हवा प्रदुषण म्हण्टलं की सर्वात आधी आठवण होते ती देशाची राजधानी दिल्लीची. विविध उपाय योजना करुन देखील दिवसेंदिवस शहरातील हवेच्या गुणवत्तेचा आकडा खालवत चाल्ला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील हवा ही प्रदुषित हवा मानल्या जाते. तरी आता दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईची हवा देखील प्रदुषित होत चाल्ली हे असं म्हणणं नाकारता येणार नाही कारण मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि दिल्लीचा निर्देशांक सारखाचं आहे. त्यामुळे मुंबईतील हवा भयंकर प्रदुषित झाल्याचं चित्र आहे. तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या वायु प्रदुषणावर सरकारचं मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. सबंधीत बाबीवर महाराष्ट्र सरकारने अजुन तरी कुठलही ठोस पाऊल उचललेलं नाही. तरी दिवसेंदिवस हवेच्या गुणवत्तेचा खालावणारा निर्देशांक मुंबईकरांसाठी चिंता निर्माण करणार आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या 245 वर गेला आहे.
दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्यानं अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 245 असून, तो धोकादायक श्रेणीत आहे. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (Delhi Air Quality Index) देखील 245 वर आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच प्रशासना कडून यावर ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक आहे. (हे ही वाचा:- Weather Update: हिवाळ्यात पावसाळा! राज्यात पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा महत्वपूर्ण अंदाज)
माझगावातील एक्यूआय (Air Quality Index) 313 वर, चेंबुरमध्ये 319 तर बीकेसीतील एक्यूआय 300 च्या वर आहे. तर नवी मुंबईत हवेची गुणवत्ता 242 वर, अंधेरी 266, बोरीवली 132, वरळी 114, मालाड 232, कुलाबा 280, भांडूप 169 वर गेली आहे. मुंबई उपनगरातील इतर ठिकाणांवरील हवा गुणवत्तेत किंचित सुधारणा झाली आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मुंबई शहराच्या तुलनेत सुरक्षित आहे असं म्हणता येईल.