Mumbai: बेकायदेशीर कॉल सेंटर्स चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणांना अटक

अमेरिका आणि कॅनेडियन नागरिकांना लक्ष्य करुन बेकायदेशीर कॉल सेंटरची आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डिटेक्शन क्राइम ब्रांचच्या विशेष पथकाने 6 जणांना अटक केली आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

मुंबईत (Mumbai) बेकायदेशीर कॉल सेंटर (Illegal Call Centers) चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या व्यक्ती अमेरिका (US) आणि कॅनेडियन (Canadian) नागरिकांना लक्ष्य करत होत्या.  बेकायदेशीर कॉल सेंटरचे आंतरराष्ट्रीय रॅकेट (International Racket) चालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांना डिटेक्शन क्राइम ब्रांचच्या (Detection Crime Branch) विशेष पथकाने (Special Team) अटक केली आहे. त्यांच्याकडून स्मार्टफोन, लॅपटॉप आणि बेकायदेशीर खरेदी  डेटाबेस जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) Crime Intelligence Unit कडून देण्यात आली आहे. (Coronavirus: कार्यालयात 50 % पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या भायंदर येथील कॉल सेंटरवर मुंबई पोलिसांची कारवाई)

यापूर्वी दिल्लीमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर चालवणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली होती. आरिफ अब्दुल रशीद (24) आणि सुजहुद सुहेलहुद (25) अशी या दोघांची नावं असून ते दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात असणाऱ्या शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. आरोपी उच्च पगाराच्या नोकऱ्या ऑफर करत होते. मात्र ऑफर लेटर आणि इतर फॉर्मालिटीज पूर्ण करण्यासाठी पैसे मागत असतं. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या महिलेला आरोपींनी नोकरी देतो असे सांगून 40,000 चा गंडा घातला होता.

ANI Tweet:

दरम्यान, जुलै महिन्यामध्ये मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर फेक प्रोफाईल बनवून फसवणाऱ्या टोळीला अटक केली होती. फेक फॉलोअर्स आणि लाईक्स विकण्याचे काम ही टोळी करत होती. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट फेक फॉलोअर्स आणि लाईक्सचे विकण्याचे काम एका वेबसाईटद्वारे करत होते. बॉलिवूड गायिका भुमी त्रिवेदी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif