अबब! म्हाडाच्या घरांची किंमत कोटींच्या घरात

मुंबई गृहनिर्माण मंडळाने शनिवारी 1384 घरांसाठी जाहिरात काढणार आहेत. तर या घरांची किंमत ही कोटींच्या घरात असून ती मध्यमवर्गीयांना परवडणार का प्रश्न उभा राहिला आहे.

मुंबई म्हाडा लॉटरी 2018 Photo Credit : PTI

मुंबई गृहनिर्माण मंडळाने शनिवारी 1384 घरांसाठी जाहिरात काढणार आहेत. तर या घरांची किंमत ही कोटींच्या घरात असून ती मध्यमवर्गीयांना परवडणार का प्रश्न उभा राहिला आहे.

येत्या 5 नोव्हेंबरला घरांसाठची जहिरात येणार आहे. तसेच या म्हाडाच्या घरांची लॉटरी 16 डिसेंबरला जाहिर करण्यात येणार आहे. या घरासंबंधित म्हाडाने शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन या घरांच्या किंमती बाबत सांगितले आहे. तर या घरांसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर ठरविण्यात आली आहे. मात्र ग्रँट रोड येथील घरांची किंमत 5 कोटी 80 लाख आहे. तर स्वस्त घरांची किंमत 14 लाख 62 हजार ठरविण्यात आली आहे.

म्हाडाची घरे कुठे आणि किती?

अँटॉप हिल - 287

प्रतिक्षानगर, शीव  - 89

गवाणपाडा, मुलुंड - 269

पीएमजीपी, मानखुर्द- 316

सिद्धार्थनगर, कांदिवली(प) - 170

तुंगा, पवई इमारत दुरुस्ती - 101

मंडळाकडून प्राप्त घरे - 50

म्हाडा पुनर्विकासातून प्राप्त सदनिका - 19

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement