IPL Auction 2025 Live

Local Mega Block: रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक आणि इतर तपशील पहा

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Mumbai Local Train | (File Image)

Local Mega Block: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे हाती घेतल्यामुळे रविवारी मध्य रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताच ब्लॉक नसणार, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रविवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास तापदायक होण्याची शक्यता आहे. तांत्रिक कामांमुळे लोकल विलंबाने धावतील. तर काही स्थानकांवर लोकलच थांबणार नाहीत. त्यामुळं नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असं अवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. अशावेळी प्रवाशांनी खोळंबा टाळण्यासाठी घराहाबेर पडण्याअगोदर वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचे नियोजन करावे, असं अवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे

माटुंगा- मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांत थांबतील. तर नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांत लोकल थांबणार नाही.

हार्बर मार्ग

सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी-वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तसंच, सीएसएमटी-गोरेवार/ वांद्रे अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर, ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेलदरम्यान 20 मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करता येणार आहे.