Jumbo Mega Block: मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, 350 लोकल आणि अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द

कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

Mega Block | (File Image)

मध्य रेल्वेवर (Central Railway) 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी असेल. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान, 350 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.  ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या मार्गिकेवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गिकेवर आणि 6 व्या मार्गिकेवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे.

पाहा पोस्ट -

कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.

रविवार, ४ फेब्रुवारी रोजी रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केल्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. विशेष म्हणजे सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. त्याचप्रमाणे, ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकादरम्यान ट्रान्सहार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. हार्बर आणि उरण मार्गावर मेगाब्लॉक नसला तरी पश्चिम रेल्वेवर अंधेरी आणि बोरिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक असेल.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif